हा कीडा दिसताच ठेचून मारून टाका नाहीतर...

असे बरेच जीव आहेत.
ज्यांच्यामुळे आपल्याला काय धोका होऊ शकतो, याची माहिती नसते. 

असाच जीव म्हणजे
या फोटोत दिसणारा
हा कीडा.

दिसायला गांडुळसारखा असलेला हा कीडा ज्याला हॅमरहेड वॉर्म म्हटलं जातं.

हॅमरहेड म्हणजे हातोड्यासारखं डोकं असलेला. 

त्याच्या एका टोकाला हातोड्यासारखा आकार दिसतो आहे.

हा कीडा
फार मोठा नसतो.
तो जेलसारखा असतो. 

दिसायला गांडुळासारखा असला तरी,
फायदे काहीच नाहीत. 

उलट तो खूप खतरनाक आहे. त्याची शिकारीची पद्धत खूप भयंकर आहे. 

शिकारीसाठी हा चिकट द्रव सोडतो, त्यात
घातक केमिकल असतं.

हा द्रव शिकाऱ्याचं पाणी करतो आणि हे पाणी पिऊन हॅमरहेड आपली भूक मिटवतो.

सामान्यपणे हा कीडा गांडुळांना खातो. गांडुळ शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे.

गांडुळांना खाणारे हे कीडे जिवंत राहिल्यास यांच्यामुळे गांडुळ नष्ट होतील. 

अप्रत्यक्षरित्या हे कीडे पर्यावरणाचे शत्रू ठरतील. 

त्यामुळे हा कीडा दिसल्यास दूरच राहा. किंबहुना त्याला मारूनच टाका.