तरुणपणीच टक्कल पडतंय? 'हे' उपाय करा

सध्या बऱ्याच जणांना तरुणपणीच केस गळणे आणि टक्कल पडण्याची समस्या जाणवते.

तेव्हा ही समस्या रोखण्यासाठी काही रामबाण उपाय लक्षात घ्या.

कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असते. याचा वापर केल्याने स्कॅल्पला नुकसानदायी असलेले फ्री रॅडिकल्सला दूर करण्यासाठी प्रभावी ठरते.

कढीपत्त्यामध्ये विटामिन बी आढळते ज्यामुळे केसांची मूळ मजबूत होतात.

कढीपत्त्याचा हेअर मास्क बनवून तुम्ही केसांवर लावू शकता. याने केस गळणे कमी होईल.

कढीपत्त्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी कढीपत्ता, थोडी मेथी, आवळा घेऊन त्याची पेस्ट तयार करा.

ही पेस्ट केसांवर लावून अर्धा तास ठेवा आणि मग धुवून टाका.

नारळाच्या तेलात कढीपत्ता टाकून थोडावेळ उकळवा आणि थंड झाल्यावर केसांवर लावा.

हे तेल केसांसाठी टॉनिक म्हणून काम करेल. याने केस गळण थांबेल आणि नवीन केस देखील येतील.

केसात डँड्रफ होत असेल तर कढीपत्ता आणि दही एकत्र करून केसांवर लावा. यामुळे डँड्रफची समस्या दूर होते.

हेअर मास्क बनवण्यासाठी कढीपत्ताची पेस्ट बनवा आणि तो दह्यात मिसळून केसांवर अर्धातास लावा.