जवानाच्या
धडधडत्या हृदयाजवळून
जिवंत बॉम्ब काढताना...

साधा फटाका बॉम्ब
आपल्या शरीरावर फुटला तर काय होतं हे तुम्हाला माहितीच आहे.

विचार करा युद्धात वापरला जाणारा जिवंत बॉम्ब एका सैनिकाच्या शरीरात अडकला तर...

रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनियन सैनिकासह असं भयंकर घडलं.

जवानाच्या छातीत हृदयाजवळ जिवंत ग्रेनेड बॉम्ब अडकला. 

सामान्यपणे जेव्हा हा बॉम्ब टार्गेटवर आपटतो तेव्हा दाबाने तो फुटतो.

पण आश्चर्य म्हणजे या सैनिकाच्या छातीत
हा बॉम्ब फुटला नाही.

छातीतून
जिवंत बॉम्ब काढणं डॉक्टरांसाठीही आव्हानात्मक होतं.

छोटीशी चूक आणि त्याचा कधीही स्फोट होण्याची शक्यता होती.

पण डॉक्टरांनी ती रिस्क घेतली आणि सर्जरी करून तो बॉम्ब काढला.