SBI प्री-अप्रूव्ह्ड इन्स्टंट पर्सनल लोन

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन्सची सुविधा उपलब्ध केली आहे. 

ग्राहकांना 24 बाय 7 तत्त्वावर YONO SBIच्या माध्यमातून केवळ चार क्लिक्सवर ही सेवा उपलब्ध होणार आहे.

प्री-अप्रूव्ह्ड लोन्स घेताना बँकेकडून ग्राहकांना कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत. 

अर्थातच ही सुविधा निवडक ग्राहकांसाठीच उपलब्ध असते. क्रेडिट हिस्ट्री चांगली असलेल्या ग्राहकांची निवड यासाठी केली जाते.

ही लोन्स अवघ्या काही सेकंदांमध्ये मंजूर होतात आणि त्यासाठी काही सिक्युरिटी किंवा कोलॅटरल लागत नाही.

स्टेट बँकऑफ इंडियाचे ग्राहक 567676 या क्रमांकावर PAPL असा एसएमएस पाठवून आपण या सुविधेसाठी पात्र आहोत का, हे तपासू शकतात.

फेस्टिव्ह ऑफरअंतर्गत कर्जदारांना या योजनेमध्ये 31 जानेवारी 2022पर्यंत प्रक्रिया शुल्क माफ केलं जाणार आहे. त्यानंतरच्या काळातही शुल्क कमी असेल.

ही सुविधा ग्राहकांना योनो अॅपच्या माध्यमातून घेता येणार असून, कोणतीही फिजिकल कागदपत्रं लागणार नाहीत.

यासाठी व्याजदर 9.60 टक्क्यांपासून सुरू होत आहेत.

पात्र ग्राहकांनी योनो अॅपमध्ये लॉगिन करून Avail Now या पर्यायातून कर्जाची रक्कम आणि मुदत निवडावी. ओटीपी एंटर केल्यावर थोड्याच वेळात संबंधितांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा होईल.