उन्हाळ्यात खाण्यापिण्याच्या गोष्टी फ्रेश रहाव्यात यासाठी तुम्ही फ्रिजचा वापर करत असाल.
अनेकदा लोक वस्तू खराब होऊ नयेत म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवतात.
परंतु यामुळे फ्रिजमध्ये दुर्गंधी पसरून त्याचा उग्र वास येतो. तेव्हा कोणत्या गोष्टी फ्रिजमध्ये ठेऊ नये हे जाणून घ्या.
काहीजण फ्रिजमध्ये लसूण आणि कांदा स्टोर करून ठेवतात. परंतु असे केल्याने लसूणला लवकर अंकुर फुटतात.
तसेच कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यास तो लवकर खराब होतो.
केळ फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याचा रंग आणि चव सर्वच खराब होते. तेव्हा केळ हे फ्रिजच्या बाहेरच ठेवाव.
कॉफी बीन्स फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव पूर्णपणे बदलून जाते. तेव्हा कोफी बीन्स फ्रिजच्या बाहेर एका बंद बरणीत ठेवा.
काहीजण ऑलिव ऑईल फ्रिजमध्ये ठेवतात. ज्यामुळे त्याच्यात गुठळ्या तयार होतात.
ब्रेड देखील फ्रिजमध्ये ठेवल्यास तो कडक होऊ लागतो. त्यामुळे ब्रेड खरेदी केल्याच्या 1 ते 2 दिवसात खाऊन संपवून टाका.
टोमॅटो अनेकदा फ्रिजमध्ये ठेवले जातात. परंतु असे केल्याने त्यांची चव बदलून ते लवकर खराब होतात.
मध फ्रिजमध्ये ठेवल्यास ते गोठून जाते.
बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याला मोड येतील.
कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातले अँटीऑक्सिडंट मरून जातात. त्यामुळे कलिंगडाला फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी बाहेर पाण्यात ठेवा.