दुर्मीळ दुतोंड्या साप कसा असतो? 

मांडूळ या दुर्मीळ जातीच्या सापाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते.

हा साप सहजासहजी मिळत नाही. तंत्र विद्या आणि औषधांसाठी या प्रजातीच्या सापाचा वापर होतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात याला कोट्यवधींची बोली लागते.

सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे.

मंद हालचाल, जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे.

 लालसर किंवा तपकिरी रंगांचा हा साप असतो. या सापाचा शोध घेण्यासाठी तस्कर जंगलात फिरत असतात.

गुप्त धन शोधणे, औषधी गुणधर्म अशा अनेक अंधश्रद्धांना बळी पडलेला या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी होते.