तोंडात मासा टाकून दम्यावर उपचार

हैदराबादमध्ये दम्यावर उपचारासाठी एक प्राचीन उपाय प्रचलित होत आहे.

मागील 170 वर्षांपासून हैदराबादच गौड कुटुंब दम्याच्या आजाराला पूर्णपणे बरा करण्याचा दावा करत आहेत.

या उपचारात दम्याच्या रुग्णांना एक औषध माश्याच्या साहाय्याने दिले जाते.

देशभरातून हजारो लोक नामपल्ली प्रदर्शनी मैदानमध्ये दम्याच्या उपचारासाठी एकत्र येतात.

हे औषध 'मृगसिरा कार्ती' यादिवशी दिली जाते.  जी जून महिन्यात मान्सूनच्या आधी येते.

एका जिवंत मरळ माश्याच्या तोंडात औषध भरले जाते. मग हा मासा रुग्णांच्या तोंडात टाकला जातो.

ही उपचारपद्धती गुप्त जडी बुटी च्या सूत्रावर आधारित आहे.

बथिनी गौड कुटुंब दरवर्षी हजारो दम्याच्या रुग्णांवर उपचार करतात.

या गुप्त आणि खास जडी बुटींना कुटुंबाच्या सदस्यांकडे सोपवले जाते.