अजिंठा-वेरूळ लेणीनंतर औरंगाबादमध्ये आणखी काय पाहाल? 

भारत, महाराष्ट्रच नव्हे तर, जगभरात एक महत्त्वाचं शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे.

या शहरात ताजमहालसारखा 'बीबी का मकबरा' आहे. औरंगजेबाची पत्नी दिलरस बानोसाठी हा महाल बांधला होता. 

1661 बांधलेला हा मकबरा हुबेहूब ताजमहालसारखा दिसतो. याला 'दख्खनचा ताज' म्हटलं जातं. 

शहरापासून 20km अंतरावर बौद्ध मंदिर आहे. तेथील दगडी गुहा प्रसिद्ध आहेत.  6 व्या आणि 8 व्या शतकातील आहेत.

गुहा साॅफ्ट बेसाॅल्ट खडकापासून तयार करण्यात आल्या आहेत. ट्रेकिंगसाठी ही गुहा आदर्श मानली जाते. 

12 ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वर मंदिर आहे. युनेस्कोच्या यादीत त्याचा समावेश आहे. 

मंदिराची वास्तुकला ही दक्षिण भारतीय शैलीतील आहे. फिरण्यासाठी पवित्र स्थान मानलं जातं. 

शहरापासून 15 किलोमीटर दूर दौलताबाद किल्ला हा महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे. कारण, तिथं जाण्यासाठी 750 पायऱ्या आहेत. 

सिद्धार्थ गार्डन हे उत्तम लोकप्रिय पिकनिक स्पाॅट आहे. तिथं प्राणी संग्रहालयदेखील आहे.