चष्मा की लेन्स, काय वापरणं असतं योग्य?

डोळ्यांसाठी चष्मा किंवा लेन्स काय वापरणं चांगलं हे आपल्याला माहित असावं. याबाबतची माहिती नेत्रतज्ज्ञ वरुण मुखर्जी यांनी दिली.

लेन्सचे अनेक प्रकार आहेत. जसे डेली वेअर लेन्स, सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्स, डिस्पोजेबल कॉन्टॅक्ट लेन्स, आरजीपी कॉन्टॅक्ट लेन्स इ.

साधारणपणे डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आजकाल लोकांचा लेन्सकडे कल वाढला आहे. 

लेन्स हा चष्म्याला पर्याय ठरू शकतो का? तर तज्ञांच्या मते, से  अजिबात अजिबात नाही. 

कार्यक्रमाला जाताना तुम्ही लेन्स घालू शकता. परंतु आपण पूर्ण वेळ लेन्स घालू शकत नाही!

ज्यांच्या डोळ्यात प्लस पॉवर आहे, त्यांनी लेन्स न घालणे चांगले. कारण पुढील गोष्टी पाहणे अधिक कठीण होईल.

मायनस पॉवर आणि जास्त पॉवर असलेल्यांना डॉक्टर लेन्स घालायला सांगतात. 

कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना खूप काळजी घ्यावी लागते. जे चष्म्याच्या बाबतीत खूपच कमी आहे.

त्यामुळे लेन्सपेक्षा चष्मा चांगला मानला जातो.