लग्नानंतर पती किंवा पत्नी बाहेर अफेअर का करतात, यामागे काय कारणं असू शकतात?

सुखी वैवाहिक जीवनासाठी विश्वास आणि निष्ठा खूप महत्त्वाची असते, पण काहीजण जोडीदाराला फसवतात.

पती किंवा पत्नीचं दुसऱ्यासोबत अफेअर सुरू असतं; पण अशी अफेअर का सुरू होतात, ते पाहुया?

1) सायबर अफेअर हे आधुनिक प्रकारचं अफेअर आहे. आजच्या डिजिटल युगात अनेक जण याला बळी पडतात.

हे रिलेशन इमोशनल किंवा सेक्शुअल असतं. दिवसेंदिवस अशा अफेअरचे प्रमाण वाढत आहे.

2) सध्या रोमँटिक अफेअर हा प्रकारही वाढतोय, या नात्याची सुरुवात मैत्रीपासून होते, 

पण हळूहळू त्याचं रूपांतर प्रेमात होतं आणि पुढं हे प्रेमसंबंध संपवणं खूप कठीण होऊन बसतं.

3) अनेक जण सेक्स अॅडिक्ट असतात, सेक्सचं व्यसन असतं. त्यांचा जोडीदाराशी कोणताही भावनिक संबंध नसतो.   

4) जुन्या प्रेमाची आठवण - आयुष्याचा जोडीदार निवडण्यात चूक झाली आहे, असं काहींना वाटत असतं. 

अशा व्यक्तींना दुसऱ्याशी प्रेमसंबंध निर्माण करायचे असतात. ते नातं इमोशन किंवा सेक्शुल असतं

विवाहबाह्य संबंध असल्याची अनेक प्रकरणं अलीकडे समोर येतात. यातून अनेकदा मोठे गुन्हेही घडतात.

त्यामुळे पती-पत्नी या दोघांनी वेळीच सावध होऊन स्वतःचा जोडीदार विवाहबाह्य संबंध ठेवणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे.