टोमॅटोनंतर आता 'ही' भाजीही झाली महाग!
बिपरजॉय वादळामुळे गुजरातसह महाराष्ट्रातही खूप विध्वंस झाला.
इथे अनेक भाज्यांची पिकं नष्ट झाली, त्यांचे खूप नुकसान झाले.
टोमॅटो तर गेल्या काही दिवसांपासून महाग मिळतच आहेत. पण आता इतरही भाज्या तितक्याच महाग झाल्या आहेत.
आता फुलकोबीची किंमतदेखील पूर्वीपेक्षा जास्त झाली आहे.
सध्याच्या काळात आंबे 100 रुपयांत एक ते दीड किलो मिळत आहेत.
तर फुलकोबीचे एक फुल चक्क 80 ते 100 रुपयांना मिळत आहे.
15 ते 20 दिवसांनंतर ही किंमत कमी झालेली दिसू शकते.
फुलकोबी होलसेलमध्ये 50 ते 55 रुपयांना मिळते.
तर रिटेल सेलरकडे हीच फुलकोबी 80 ते 100 रुपयांना मिळते.