अंडं आधी की कोंबडी?अखेर उत्तर सापडलं
अंडं आधी की कोंबडी? जगातील सर्वात कठीण प्रश्न म्हटलं तर हरकत नाही.
यूकेतील शेफील्ड, वॉर्विक युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी याचा अभ्यास केला.
अनेक वर्षांच्या शोधानंतर त्यांना या प्रश्नाचं
योग्य उत्तर सापडलं.
शास्त्रज्ञांनी पुराव्यानिशी स्पष्टीकरण देत याचं उत्तर दिलं आहे.
अंड्याच्या कवचेत ओवोक्लाइडिन प्रोटिन असतं.
ओवोक्लाइडिन प्रोटिन
फक्त कोंबडीच्या गर्भाशयात तयार होतं.
कोंबडीच्या गर्भाशयातील या प्रोटिनच्या वापराशिवाय
अंडं तयार होत नाही.
याचा अर्थ कोंबडीच्या गर्भाशयात ओवोक्लाइडिन बनलं आणि त्यापासून अंडं.
त्यामुळे आधी कोंबडी आणि नंतर तिच्या गर्भामार्फत
अंडं जगात आलं.