लवकर प्रमोशन मिळण्यासाठी प्रभावी मार्ग

केवळ हार्ड वर्कर अर्थात खूप कष्ट करणारा कर्मचारी बनण्यापेक्षा प्रभावी, कार्यक्षम कर्मचारी बना. 

तुम्ही काय काम करताय हे शक्यतो सर्वांना समजू द्या आणि तुमच्या कामाची माहिती तुमच्या बॉसला देत राहा.

कामाच्या ठिकाणी तुमच्यातलं वेगळेपण उठून दिसेल, अशी कौशल्यं आत्मसात करा. 

कामाची जबाबदारी घ्या आणि टीम प्लेयर बनणं अर्थात संघभावनेने काम करणं विसरू नका. 

वक्तशीर राहा आणि दिलेल्या डेडलाइन्स पाळा. 

गरजा ओळखा आणि बॉसचं काम सोपं करा. वरिष्ठांकडून, चांगलं काम करणाऱ्यांकडून अभिप्राय मागा. 

तुमच्याकडून नेमकी कशाची अपेक्षा केली जातेय हे ओळखा आणि ती पूर्ण करा. 

लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करा आणि नियोजनबद्ध राहा. 

अंतर्गत संवादसाखळीमधला दुवा व्हा.