मिक्सरमध्ये कणिक मळण्याची सोपी ट्रिक

चपात्यांचे कणिक मळणे हे सगळ्या गृहिणींसाठी अतिशय कंटाळवाणे काम असते.

तेव्हा मिक्सरचा योग्य वापर करून तुम्ही कणिक मळू शकता.

मिक्सरमध्ये कणिक मळण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरचे आकाराने मोठे असणारे भांडे घ्यावे.

आता या भांड्यात आपल्याला हवे तेवढे गव्हाचे पीठ ओतून घ्यावे.

त्यानंतर या गव्हाच्या पिठात गरजेनुसार पाणी आणि तेल घालावे.

आता मिक्सरचे झाकण लावून मिक्सर सुरु करावा. मिक्सर आधी हळूहळू फिरवून घ्यावे. मिक्सरच्या वेग एकदम एकाचवेळी जास्त प्रमाणात वाढवू नये.

मिक्सरच्या भांड्यात हळूहळू पिठाचा गोळा तयार होताना दिसेल. गरज असल्यास आपण यात पाणी घालू शकतात.

गरजेनुसार पाणी घातल्यानंतर मीठ एकत्रित होऊन मळून त्याचा गोळा तयार होताना दिसेल.

कणिक संपूर्णपणे मळून झाल्यानंतर, मिस्कर मधून कणकेचा गोळा बाहेर काढून घ्यावा. त्यानंतर आवश्यकतेनुसार, त्याला तेल लावून घ्यावे.

या तयार कणकेचे छोटे - छोटे गोळे तयार करून मग नेहमीप्रमाणे चपात्या लाटून घ्याव्यात.