भूकंपात
स्वतःला
कसं वाचवायचं?

भूकंपाचा हादरा बसताच तातडीच्या मदतीसाठी प्रशासनाला माहिती द्या.

तुम्ही घरात असाल तर खाली जमिनीवर किंवा फरशीवर बसा.

टेबल, फर्निचरखाली बसा,
हातानं आपलं डोकं झाकून घ्या.

दरवाजे, खिडक्या आणि भितींपासून दूर राहा.

घरात गॅस सिलेंडर, विजेचा मुख्य स्विच बंद करा.

भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर चुकूनही करू नका.

घराबाहेर असाल तर
उंच इमारती, विजेच्या खांबापासून दूर राहा.

कोणतीही खोल, कमकुवत जागा, जुन्या घराजवळ उभे राहू नका.

वाहन चालवू नका किंवा वाहनातून प्रवास करू नका. 

सुरक्षित जागेवर कुठेतरी उभे राहून स्वत:चे संरक्षण करा.