एका ड्रॅगन फळामध्ये 102 कॅलरी ऊर्जा, 22 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि 13 ग्रॅम साखरही असते. त्यामुळे हृदयरोग्यांसाठी फायदेशीर आहे.
ड्रॅगन फ्रूट पचनक्रिया बळकट बनवते. याच्या बियांमध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-9 फॅटी अॅसिड्स आढळतात. ज्यामुळे हृदयाच्या पेशी मजबूत होतात.
ड्रॅगन फ्रूटमध्ये फॅट अजिबात नसते. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. ड्रॅगन फ्रूटचे सेवन वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
ड्रॅगन फ्रुटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक अॅसिड आणि बेटासायनिन्स यांसारखे अँटिऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे वृद्धत्वाचा प्रभाव कमी होतो.
ड्रॅगन फ्रूटमध्ये प्रीबायोटिक गुणधर्म असतात. जे आतड्यातील चांगल्या जीवाणूंना पोषण पुरवते. आतड्यात निरोगी जिवाणूंची संख्या खूप जास्त असेल तर पचनसंस्थेला खूप चालना मिळते.
अँटीऑक्सिडंट स्वादुपिंडातील खराब पेशींची दुरुस्ती करतात. स्वादुपिंड निरोगी असल्यास इन्सुलिन योग्य प्रकारे तयार होतो. इन्सुलिन रक्तातील साखरेचे विघटन करून त्याचे ऊर्जेत रूपांतर करते.
ड्रॅगन फ्रुटमध्ये बीटा कॅरोटीन आणि लायकोपीन आढळतात. कॅरोटीनॉइड समृद्ध अन्न सेवन केल्याने कर्करोग आणि हृदयविकाराचा धोकादेखील कमी होतो.
ड्रॅगन फ्रूटमधून आपल्याला पुरेसे फायबर मिळते. तुम्हाला संपूर्ण धान्य आवडत नसेल तर त्याजागी तुम्ही ड्रॅगन फ्रूट खाऊ शकता.
ड्रॅगन फ्रुटमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-सी, अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती आणि अनेक आजारांशी लढणे सोपे जाते.