चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नका 'हे' पदार्थ!
उन्हाळ्यात आपण पाणी आणि अन्न साठवण्यासाठी फ्रीजचा वापर जास्त प्रमाणात करतो.
सर्व पदार्थ आणून आपण ते खराब होण्याच्या भीतीने फिजमध्ये साठवतो.
पण तुम्हाला माहितीये? काही पदार्थ उलट फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे लवकर खराब होण्याची शक्यता असते.
टोमॅटो फ्रिजमध्ये कुजण्याची शक्यता असते, त्यामुळे टोमॅटो आणि लिंबूवर्गीय फळं फ्रिजमध्ये ठेऊ नये.
बटाटे फ्रिजमध्ये ठेऊ नये, कारण फ्रीजचे तापमान बटाट्यांसाठी खूप थंड असते.
अति थंड वातावरणामुळे लसूण मऊ होऊ शकतो. तसेच चिरलेला कांदाही फ्रिजबाहेर कागदी पिशवीत ठेवावा.
याशिवाय शिमला मिरचीदेखील फ्रिजमध्ये ठेवल्यास ती लवकर मऊ होण्याची शक्यता असते.
कलिंगड आणि केळी ही फळंदेखील फ्रिजमध्ये ठेवणं टाळावं.
त्याचबरोबर मनुकादेखील फ्रिजच्या थंड वातावरणात ठेवणे योग्य नाही.