लहान मुलांनी
चहा का पिऊ नये?
अनेकदा घरातील मोठ्या माणसांना पाहून लहान मुल देखील चहा पिण्याचा हट्ट करतात.
त्यामुळे लहान मुलांना चहा बिस्कीट सारखे पदार्थ खाऊ घातले जातात
परंतु चहा, कॉफी सारखे पदार्थ लहान मुलांना देणं योग्य नाही.
चहा कॉफी सारख्या पेयांमध्ये भरपूर प्रमाणात साखर आणि कॅफिन असते.
चहा आणि कॉफी यासारख्या पदार्थांचे सेवन केल्याने लहान मुलांचे दात किडतात आणि कॅव्हिटी होऊ शकते.
तज्ञांच्या मते 12 वर्षांखालील लहान मुलांना कॅफीनयुक्त पदार्थ देऊ नयेत.
12 ते 18 वर्षांमधील मुलांनी दिवसभरात दोन कप चहा घेतला तर चालतो.
लहान मुलांनी याचे सेवन केल्यावर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
लहान मुलांना तुम्ही हर्बल टी देऊ शकता. ही सवय आरोग्यासाठी चांगली आहे.