'हा' नाश्ता आरोग्यासाठी ठरू शकतो घातक!
नाश्त्यामध्ये आपण आहारात फायबर, प्रोटिन्स आणि हेल्दी फॅट्सचे सेवन केले पाहिजे.
मात्र आहार घेताना काही सावधगिरी बाळगणेदेखील आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, नाश्त्यामध्ये काही पदार्थ अजिबात खाऊ नये, अन्यथा आरोग्याला हानी पोहोचू शकते.
सकाळी सर्वात आधी कॉफी प्यायल्याने फ्रेश वाटत असले तरी ते आरोग्यासाठी मुळीच चांगले नाही.
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. पोट भरलेले असताना कॉफी पिणे चांगले.
व्हाईट ब्रेडमध्ये पोषक घटक कमी असतात आणि यामुळे पचनावर परिणाम होतो.
पॅक केलेल्या ज्यूसमध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि साखर जास्त प्रमाणात असते. हे प्यायल्यास आरोग्य बिघडू शकते.
हल्ली नाश्त्यामध्ये तृणधान्य खाण्याचा ट्रेंड वाढलाय. परंतु ते प्रक्रिया करून तयार केल्यामुळे आरोग्यासाठी चांगले तितकेसे चांगले नसते.
नाश्त्यात फ्लेवर्ड दही खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. यामध्ये साखरेचे प्रमाणही जास्त असते.