डिंपल यादव आणि त्यांची मुलगी कोविडग्रस्त

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

बुधवारी डिंपल आणि त्यांची मुलगी टीना यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली. 

दोघींच्या आजारात कोविडची लक्षणं दिसलेली नाहीत त्या लखनौमध्ये घरात क्वारंटाइन आहेत. 

गेल्या काही आठवड्यांत आपल्याला भेटलेल्या व्यक्तींना कोविड चाचणी करण्याचं आवाहन डिंपल यांनी ट्विटद्वारे केलं आहे. 

2012 मध्ये कन्नोजमधून निवडणुकीत विजय मिळवत डिंपल यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. 

पुण्यात जन्मलेल्या डिंपल यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यातच झालं आहे.

लखनौ विद्यापीठातील कॉलेजमध्ये अखिलेश आणि डिंपल यांची भेट झाली होती.

अखिलेश यांचे वडील मुलायम सिंग यादव हे या लग्नाला अनुकूल नव्हते.

अखिलेश यांनी वडिलांची समजूत काढली. या जोडप्यानं 1999 मध्ये लग्नगाठ बांधली

अखिलेश आणि डिंपल यांना आदिती आणि टीना या दोन मुली आणि अर्जुन हा मुलगा आहे.