जिऱ्याचं नाव घेताच तुम्हाला आधी काय आठवेल? तर खमंग फोडणी. जिऱ्याचा उपयोग प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात होतो.
जिरा पदार्थांची चव वाढवतोच, शिवाय जिरा चेहऱ्याचं सौंदर्यही वाढवतो हे तुम्हाला माहीत आहे का? हो हे सत्य आहे.
जिऱ्याचा स्क्रब बनवून तुम्ही प्रभावीपणे उपयोग करू शकता. घरी हा स्क्रब कसा तयार करायचा, जाणून घेऊ.
जिऱ्याचा स्क्रब वापरलात तर काहीच वेळात तुमची त्वचा स्वच्छ होईल. चेहऱ्यावर वेगळाच निखार येईल
जिऱ्याचा स्क्रब बनवणं अगदीच सोपं आहे.बारीक केलेली जीरा पावडर - 1 चमचामध - 1 चमचाबदाम तेल - 1 चमचा
या सगळ्या गोष्टी एका लहानशा वाटीत घेऊन मिक्स करा. चांगल्या मिक्स झाल्यावर हातावर घेत चेहऱ्यावर हलक्या स्क्रब करा.
जवळपास 3 ते 4 मिनिट असं केल्यावर तुमच्या त्वचेवर प्रभाव जाणवेल.
स्क्रब केल्यावर चेहरा कोमट पाण्यानं धुवा. यानंतर त्वचेवर टोनर लावा. त्वचेचा पोत जसा आहे त्यानुसार टोनर लावा.
पण कोणतं टोनर लावायचं हे माहीत नसेल तर गुलाबजल वापरू शकता.
जिऱ्याचा स्क्रब खूप फायदेशीर आहे. तुमची त्वचा तेलकट किंवा कोरडी असेल तर हा स्क्रब वापरा. हा स्क्रब पूर्णतः नैसर्गिक आहे.
स्क्रबद्वारे चेहऱ्याची मृत त्वचा निघून जाते. त्वचेची छिद्र साफ होतील. केवळ चेहऱ्यावरचं नाही इतर सगळ्या शरीरावर तुम्ही हे स्क्रब लावू शकता.
जीरा ई जीवनसत्व असलेला पदार्थ आहे. यातून त्वचा मुलायम होते आणि डागही निघून जातात.
सोबतच जिऱ्यामध्ये अँटी फंगल गुण असतात. यातून त्वचेला संसर्ग होत नाही. पिंपल्स, सूज, ब्लॅक हेड्स दूर होतात.
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here