सलग 2 तास खुर्चीत बसणं, धुम्रपानाइतकच घातक?

ऑफिसमध्ये बहुतांश लोकांना खुर्चीत बसूनच काम असते. 

या दीर्घकाळ बसण्याचा आपल्या शरीरावर खूप हानिकारक परिणाम होतो. 

बंगळुरूच्या अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रियांका रोहतगी यांनी याबाबत माहिती दिली. 

सतत 2 तास खुर्चीवर बसणे धुम्रपानाइतकेच हानिकारक आहे, असा त्यांचा दावा आहे. 

2 तास खुर्चीत बसण्याचा परिणाम शरीरात मृत्यूचा धोका देखील वाढवू शकतो. 

अभ्यासात असे दिसून आले आहे की, जास्त वेळ बसल्याने शरीरात विविध प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. 

संशोधनात असंही दिसलं की, दिवसातून 6 तासांपेक्षा जास्त वेळ बसल्याने अकाली मृत्यूचा धोका वाढतो. 

ऑफिसच्या डेस्कवर जास्त वेळ बसल्याने शरीरात चरबी जमा होऊ शकते. 

बैठे काम केल्यामुळे शरीरातील साखर वाढते, त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.