भारताचा तिरंगा ध्वज - इतिहास आणि महत्त्व
1904 साली भगिनी निवेदिता भारताचा पहिला राष्ट्रध्वज डिझाइन केला.
7 ऑगस्ट 1906 रोजी पहिला तिरंगा ध्वज कोलकात्यात फडकवण्यात आला.
22 ऑगस्ट 1907 रोजी मॅडम कामा यांनी जर्मनीत हाच ध्वज फडकवला होता.
1917चा तिसरा ध्वज होमरूल चळवळीत डॉ. अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी फडकवला होता.
1921 साली स्वातंत्र्यसैनिक पिंगली व्यंकय्या यांनी स्वराज ध्वज तयार केला.
त्यात पांढरा, हिरवा आणि लाल असे तीन पट्टे आणि मध्यभागी चरखा होता.
वर केशरी, मध्ये चरख्यासह पांढरा, खाली हिरवा अशा 3 पट्ट्यांचा ध्वज 1931 साली आला.
देश स्वतंत्र झाल्यावर डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी चरख्याच्या जागी अशोकचक्र वापरलं.
सध्याचा राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने स्वीकारला.
1950 साली भारत प्रजासत्ताक देश झाला, तेव्हा हेच डिझाइन कायम ठेवलं गेलं
आपल्या राष्ट्रध्वजातला केशरी म्हणजेच भगवा रंग धैर्याचं प्रतीक आहे.
पांढरा रंग शांतता, सत्याचं प्रतीक असून, अशोकचक्र धर्माचं प्रतीक आहे.
हिरवा रंग सुख, समृद्धी आणि विकासाचं प्रतीक मानला जातो.
तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?