रोज एक लवंग आरोग्याच्या अनेक समस्या ठेवेल दूर!
लवंग हा केवळ मसालाच नाही तर माऊथवॉश म्हणूनही याचा वापर केला जातो.
ज्या लोकांना तोंडाच्या दुर्गंधीचा त्रास असेल, त्यांनी तोंडात लवंग ठेवल्यास फायदा होतो.
रात्री झोपताना एक लवंग आणि एक ग्लास कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
लवंग साधारणपणे पचन सुधारण्यास मदत करते. तसेच गॅसेस, मळमळ कमी करण्यासही मदत करते.
लवंगाच्या नियमित सेवनाने घशातील कोणताही संसर्ग बरा होतो.
लवंग छातीत जमा झालेला कफ काढून टाकण्यास मदत करते, घशाच्या समस्या दूर होतात.
लवंग रक्तातील विविध प्रकारच्या शर्करा वेगवेगळ्या पेशींपर्यंत पोहोचवण्यास मदत करते.
लवंग शरीरात मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे, ती इन्सुलिनच्या स्रावामध्ये मदत करते.
दातदुखी कमी करण्यासाठीही लवंग खूप उपयुक्त आहे, म्हणूनच टूथपेस्टमध्ये लवंग वापरतात.