तुम्हाला माहितेय का की यंदा इन्कम टॅक्स नियमांमध्ये कोणते बदल झालेत?

प्रॉव्हिडंट फंडामध्ये एका आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम गुंतवल्यास, 2.5 लाखांवरच्या रकमेवरचं व्याज करमुक्त असणार नाही. एक एप्रिल 2021 पासून हा नियम लागू झाला आहे.

पेन्शन आणि व्याजरूपी उत्पन्न असलेल्या 75 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापासून सवलत देण्यात आली आहे. संबंधित बँका टीडीएस कापून सरकारकडे जमा करतील.

2020च्या बजेटमध्ये सरकारने नवी टॅक्स यंत्रणा आणली असून, जुनी किंवा नवी यांपैकी कोणतीही यंत्रणा करदाता निवडू शकतो.

इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला नसेल, तर संबंधित व्यक्तीकडून मोठ्या दराने टीडीएस कापून घेण्याची तरतूद 2021च्या वित्त विधेयकात करण्यात आली आहे.

करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचं प्रमाण वाढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ही तरतूद केली आहे.

जास्त प्रीमिअम असलेल्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसीजना म्हणजेच युलिप पॉलिसीज कराच्या टप्प्यात आणण्यात आलं आहे.

एक फेब्रुवारी 2021पूर्वी घेतलेल्या सर्व युलिप पॉलिसीजची मॅच्युरिटी रक्कम करमुक्त आहे.

लेट फायलिंगसाठी ड्यू डेट 31 डिसेंबर ही निश्चित करण्यात आली आहे. यंदा मात्र नव्या पोर्टलच्या समस्येमुळे ती 31 मार्च 2022 अशी ठरवण्यात आली आहे.

सध्याची फॉर्म 26 AS ची सिस्टीम हळूहळू बदलत अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS) ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

 मुदतीत इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही, तर आतापर्यंत 10 हजार रुपये दंडाची तरतूद होती. आता ती रक्कम कमी करून पाच हजार रुपये करण्यात आली आहे.