नवरा-बायकोसाठी चाणक्य नीतिचं सुत्र

पती-पत्नीच्या नात्यात विश्वास, सामंजस्य आणि प्रेम महत्त्वाचं असतं. हे नसेल पती-पत्नीमध्ये टोकाचे वादविवाद होतात.

विवाहापूर्वी एकमेकांचे स्वभाव, गुणवैशिष्ट्यं यांची पारख होणं आवश्यक असतं. यामुळे भविष्यातले वादविवाद टळू शकतात.

पत्नीच्या अंगी कोणते गुण असावेत आणि कोणते गुण नसावेत याचा उल्लेख आचार्य चाणक्य आपल्या ग्रंथात करतात

जी स्त्री मनानं पवित्र, पतीवर प्रेम करणारी, पतिव्रता आहे ती स्त्री उत्तम पत्नी मानली जाते, असं चाणक्य म्हणतात

एखाद्या मूर्खाला शिकवून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवा, त्याचप्रमाणे एखाद्या दुष्ट स्त्रीसोबत रहाणे म्हणजे स्वतः जीवनात दुःखाला आमंत्रण देणं

पत्नीला वाचवण्यासाठी पैसा गमवावा लागला तरी चिंता करू नका; पण जर तुमचा आत्मसन्मान धोक्यात आला तेव्हा पत्नी आणि धन गमवायची वेळ आली तर अजिबात संकोच करू नका

पत्नी दिसायला सुंदर, सुशिक्षित असणं गरजेचं नाही पण तिच्यावरील संस्कार महत्वाचे आहे.

एक संस्कारी स्त्री संपूर्ण कुळाचा सन्मान वाढवते. पुढच्या पिढ्यांवर संस्कार करते. त्यामुळे अशा स्त्रीसोबत राहिल्याने जीवन धन्य होईल

पत्नीची परीक्षा घ्यायची असेल तर तिला एखादं भरोशाचं काम द्या. यामुळे तुम्हाला कळेल की पत्नी भरोसा ठेवण्यास योग्य आहे की नाही

चांगली पत्नी प्रतिकूल परिस्थितीतही पतीची साथ सोडत नाही. अशी पत्नी मिळण्यास नशीब लागतं, असं आचार्य चाणक्य सांगतात