'या' तीन सवयींमुळे महिला नेहमीच येतात अडचणीत
महिला आपल्या आयुष्यात अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्यांचं नुकसान होतं
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिमध्ये महिलांच्या काही चुकांबद्दल लिहून ठेवलं आहे, ज्या महिला नेहमी करतात
चाणक्य म्हणतात, स्त्रीचे अवगुण तिच्या संपूर्ण कुटुंबावर देखील परिणाम करतात, त्यामुळे या गोष्टी त्यांनी कधीही करु नये
खोटं बोलणं
ज्या स्त्रियांना खोटे बोलण्याची सवय असते त्या खोट्याच्या जाळ्यात अडकतात, सोबत संपूर्ण कुटुंबाला परिणामाला सामोरे जावं लागेल
खोट्याने क्षणभर आनंद मिळतो, पण सत्य बाहेर आल्यावर कुटुंबाच्या आनंदाला ग्रहण लागते. ही गोष्ट पुरुषांनाही लागू होते
सक्तीची संमती
सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीचे प्रत्येक निर्णयात एकच मत असणे आवश्यक आहे
महिला काही कारणास्तव कुटुंब किंवा पतीसमोर आपली बाजू मांडत नाहीतस पण नंतर कुटुंबावर याचा वाईट परिणाम होतो
आजारांकडे दुर्लक्ष
महिलांना अनेकदा आपले आजार लपवण्याची सवय असते. पण याचा तिच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो
बराच काळ योग्य उपचार न मिळाल्याने महिलांना आजार जडतात, त्यामुळे कुटुंब देखील आजारी पडतं