Bullet Girl : स्पिती व्हॅली, सचपासचा खडतर प्रवास बुलेटवरून करणारी विक्रमवीर डिंपल

बुलेट बाइक म्हटलं, की डोळ्यांसमोर चित्र येतं ते ती चालवणाऱ्या पुरुषाचंच; पण मुंबईची डिंपल सिंग त्याला अपवाद आहे. 

स्पिती व्हॅली आणि सचपास या खडतर बर्फाळ प्रदेशांचा प्रवास एकाच राइडमध्ये करणारी ती देशातली Youngest मुलगी आहे.

2019 साली तिने 500 CC रॉयल एन्फिल्ड बुलेटवरून 14 दिवसांत हा प्रवास केला. त्यांच्या 10 जणांच्या ग्रुपमध्ये 2 मुली होत्या. 

हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर India Book of Records मध्ये तिच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली.

वडिलांकडे बुलेट असल्याने ती चालवण्याचं स्वप्न तिने लहानपणापासून पाहिलं होतं; मात्र संधी मिळाली नव्हती. 

कॉलेजमध्ये ती व्हॉलिबॉलपटू झाली. 9 वेळा नॅशनल लेव्हलला राज्याचं प्रतिनिधित्व तिने केलं. 4 वेळा ती कॅप्टनही होती.

यातून तिला प्रवासाची आवड लागली; मात्र जॉब लागल्यानंतर हे सगळं बंद झालं.

2018मध्ये बुलेट रायडिंग शिकवण्याची जाहिरात सोशल मीडियावर पाहिल्यावर तिने प्रशिक्षण घेतलं आणि दोन दिवसांत शिकली.

त्याच वर्षी तिने बुलेट घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेकांनी तिला वेड्यात काढलं; मात्र आईने तिला साथ दिली.

काही महिन्यांत तिने मुंबईच्या आसपासचे रस्ते, घाट बुलेटवरून पालथे घातले. 2019मध्ये खडतर स्पिती व्हॅलीत जायचं ठरवलं.

तेव्हाही तिला विरोध झाला; मात्र तिने माघार घेतली नाही. आईचा पाठिंबाही मिळाला आणि आत्मविश्वासाने तिने ती सफर पूर्ण केली.

40 फूट उंच बर्फातून, ओल्या, खडतर रस्त्यावरून, हाडं गोठवणाऱ्या थंडीत Riding चा अनुभव नसूनही तिने हा पल्ला पूर्ण केला.

15,500 फूट उंचावरच्या सचपास मंदिरात गेल्यावर ती भावनाविवश झाली आणि बळ दिल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?