काळ्या हळदीचे जबरदस्त फायदे
हळद ही आपल्या किचन मधील सर्वात उपयोगी पदार्थ आहे.
पिवळ्या हळदी प्रमाणेच काळ्या रंगाच्या हळदीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात.
काळी हळद प्रामुख्याने भारताच्या उत्तर-पूर्व राज्यांमध्ये पिकवली जाते.
काळी हळद ही पोटाच्या समस्यांवर अधिक गुणकारी आहे. जर कोणाला पोटदुखी किंवा गॅसची समस्या असेल तर ही हळद खूप फायदेशीर ठरेल.
काळ्या हळदीची पावडर पाण्यात मिसळून पिल्याने, ती पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
सांधेदुखीच्या वेदना वाढू लागल्यावर तर अँटीऑक्सिडंट आणि अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध काळ्या हळदीची पेस्ट प्रभावित भागात लावल्यास सूज कमी होऊन आराम मिळतो.
पिवळ्या हळदीप्रमाणेच काळी हळदही त्वचेसाठी फायदेशीर असते.
हळद मध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास ग्लो येतो. याशिवाय चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्सपासूनही तुम्हाला सुटका मिळेल.
किरकोळ जखम, त्वचा सोलवटणे अशी जखम बरी करायची असल्यास काळी हळद प्रभावी ठरते.