असे पक्षी ज्यांचं घरी येणं मानलं जातं शुभ

हिंदू धर्मात देवतांसोबतच पृथ्वी-आकाश, झाडे-वनस्पती आणि पशु-पक्षी यांचीही पूजा केली जाते

वास्तुशास्त्र घरातील वास्तुसोबतच पक्ष्यांचीही माहिती देते, ज्यांचे घरात येणे अत्यंत शुभ मानले जाते

असे कोणते पक्षी आहेत, जे नशीब बदलण्याची चिन्ह देतात? चला जाणून घेऊ

नीळकंठ पक्ष्याबद्दल बोलायचे झाले तर, विशेषत: दसऱ्याच्या दिवशी त्याचे दिसणे सौभाग्य वाढीचे संकेत देते

घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे. जर तुमच्या कोणत्याही मालमत्तेभोवती घुबड दिसले तर काहीतरी चांगले घडण्याचे संकेत आहे

पोपट अचानक तुमच्या घरात येऊन बसला तर ते तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहे

तुमच्या घरात पक्ष्याने घरटे बनवले असेल, तर हे लक्षण आहे की तुमच्या घरात लवकरच सुखाचे आगमन होणार आहे

पक्ष्याचे आगमन हे कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याचे लक्षण आहे

कावळा घरात पाहुणे येण्याचे संकेत देतो. त्याचबरोबर काही ज्योतिषांच्या मते घरात कावळ्यांचे आगमन देखील शुभ मानले जाते

 जर तुमच्या घराजवळ किंवा घराच्या छतावर कोंबडा आला, तर ते काही चांगलं होण्याचे चिन्ह आहे