रोमँटिक हनीमूनसाठी परफेक्ट ठिकाण

भारतातील अशी ठिकाणं जी रोमँटिक हनीमूनसाठी एकदम परफेक्ट

डलहाउसी

हिवाळ्यात इथे खूप बर्फवृष्टी होते. उंच देवदार झाडांवर जेव्हा बर्फ पडतो तेव्हा ते खूप सुंदर दिसतात

नोव्हेंबर ते फेब्रुवारी तुम्ही इथे फिरायला गेलात तर सुंदर दृश्य पाहाता येईल

गंगटोक

हे भारतातील प्रसिद्ध हनिमून डेस्टिनेशनपैकी एक आहे. येथे सूर्योदय खूप सुंदर आहे

नथु ला पास, त्सोंगमो लेक ही येथील काही प्रसिद्ध ठिकाणे. ऑक्टोबर ते डिसेंबर येथे भेट देण्यासाठी योग्य आहेत

कुर्ग

अनेक धबधबे आणि हिरव्या कॉफीचे मळे हे कुर्गचं सौंदर्य. हिरवळ आणि थंडगार प्रदेश असं हे एक परिपूर्ण ठिकाण आहे

कुर्ग हे भारताचे स्कॉटलंड म्हणूनही ओळखले जाते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी तुम्ही इथे फिरायला जाऊ शकता

उटी

उटीमध्ये पाहण्यासारखी अनेक सुंदर ठिकाणेही आहेत. चहाचे मळे, निलगीरी हे येथील आकर्षक बिंदू

येथील हवामान खूप छान आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा महिना येथे भेट देण्यासाठी योग्य मानला जातो

वायनाड
तुम्ही केरळला जाण्याचा विचार करत असाल तर वायनाड हे अशा सुंदर ठिकाणांपैकी एक आहे जिथे तुम्ही भेट दिलीच पाहिजे

इथलं सौदर्य तुम्हाला तेथेच कैद करुन ठेवेल, इतकं अप्रतिम दृश्य आणि हवामान आहे