चला कोल्हापूर दर्शन करू; 'ही' ठिकाणं तुमच्या लक्षातच राहतील

दाजीपूर अभयारण्य कपल्ससाठी खूप चांगलं ठिकाण आहे. वाघ, अस्वल, हरिण असे प्राणीदेखील पाहायला मिळतात. 

कोल्हापुरातील छत्रपती शाहु महाराज संग्रहालय पाहिल्यानंतर राजेशाही जीवनाची कल्पना येते. 

निसर्गाची सुंदरता पाहण्यासाठी गगनबावडा छान ठिकाण आहे. मंदिरं आणि गुहा पाहण्यासारख्या आहेत. 

पावसाळ्यात रामतिर्थ धबधबा पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो. 

कोपेश्वर मंदिरांची पर्यटकांची खास पसंती आहे. कारण, तेथील वास्तुकला भन्नाट आहे. 

12 व्या शतकात बांधलेला पन्हाळा किल्ला देशातील मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. 

जगप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर 7 व्या शतकात बांधलेलं प्राचीन मंदिर आहे. लाखो भक्त दर्शनासाठी येतात. 

महालक्ष्मीचं दर्शन घेतलं की, पर्यटक ज्योतिबाच्या मंदिराकडे जातात. उंचावर असणारं हे मंदिर मनमोहक आहे.

कोल्हापुरातील रंकाळा तलाव पाहण्यासारखा आहे. हा एक मानवनिर्मित तलाव आहे. 

भवानी मंडपातदेखील शाही वस्तू पाहण्यासारख्या आहेत. इथं पूर्वी दरबार भरला जायचा.