प्रेग्नेन्सीसाठी पाळीच्या कितव्या दिवशी संबंध ठेवावे?

मुलं होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण हेल्दी मूल होण्यासाठी नेमकं कधी लैंगिक संबंध ठेवावेत याची अनेकांना माहिती नसते

आरोग्यतज्ज्ञांच्या मते एका ठराविक वेळी दाम्पत्याने लैंगिक संबंध ठेवले की, गर्भधारणेची शक्यता अधिक वाढते

गर्भधारणेच्या प्रक्रियेत ओव्ह्युलेशन हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. ज्यामुळे गर्भधारणा होते

ओव्ह्युलेशन म्हणजे काय तर स्त्रियांच्या अंडाशयातून बीजनिर्मिती होणे. स्त्रियांच्या शरीरातील बीज आणि पुरुषांच्या विर्यातील शुक्राणू यांचा संयोग झाला, तर गर्भधारणा होते

बऱ्याच स्त्रियांना ओव्ह्युलेशनचा कालावधीच माहीत नसतो. खरंतर ओव्ह्युलेशनमध्ये एका बीजाचं आयुष्य हे फक्त 24 तासांचं असतं

एकंदरीत काय तर, ओव्ह्युलेशननंतर 12 तासांच्या आत स्त्री बीज आणि शुक्राणू यांचा संयोग झाला नाही, तर गर्भधारणा होण्याची शक्यताच कमी होते

शुक्राणू गर्भाशयात 72 तास जिवंत राहतात. त्यामुळे ओव्ह्युलेशनचा कालावधी सुरू होण्यापूर्वी 3 दिवस आधीच लैंगिक संबंध ठेवावेत, त्यातून गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त वाढते

ओव्ह्युलेशनपूर्वी लैंगिक संबंध ठेवले की, गर्भाशयात आलेले शुक्राणू स्त्री बीज रिलीज झाले की, लगेचच संयोग घडून येतो

ओवह्युलेशनचा कालावधी सुरू झाला आहे, कसं ओळखायचं? तर मासिक पाळीच्या आसपासच ओव्ह्युलेशनचा कालावधी असतो

व्हजायननल डिस्चार्ज, स्तन ओढल्यासारखं वाटणं आणि पोटात एकाच बाजूला दुखणं, ही ओव्ह्युलेशनची लक्षणं आहेत

ओव्ह्युलेशनचा नेमका कालावधी माहीत करून घेण्यासाठी ओव्ह्युलेशन स्ट्रिप्सचा वापर करावा. यामुळे त्याचा निश्चित काळ कळतो ज्यामुळे प्रेगन्सीचं प्लॅनिंग सोपं जातं