वयानुसार नेमकी किती तासांची झोप घ्यावी?

झोप माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची असते.

अपुऱ्या झोपेमुळे अनेकदा मधुमेह, उच्च रक्तदाब, जाडेपणा आणि डिप्रेशनसारखे आजार बळावू शकतात. त्यामुळेच सर्व लोकांनी रोज पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

तेव्हा वयोमानानुसार किती तासांची झोप घेणे आवश्यक आहे हे तुम्हाला सांगणार आहोत.

0-3 महिन्यांच्या मुलांसाठी 14 ते 17 तास झोप गरजेची असते.

4-12 महिन्यांच्या बालकांसाठी 12 ते 16 तास घेणे झोप आवश्यक आहे.

1 ते 2 वर्षे वयोगटातील मुलांना 11 ते 14 तास झोप गरजेची असते.

3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना रोज 10 ते 13 तास झोप पुरेशी असते.

9 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांनी रोज 9 ते 12 तास झोपले पहिजे.

13 ते 18 वर्ष वयोगटातील तरूण मुलांनी 8 ते 10 तास झोप घेतली पाहिजे.

18 ते 60 वयोगटातील व्यक्तींसाठी रोज 7 तास झोप पुरेशी मानली जाते.

61 ते 64 वयातील व्यक्तींनी रोज 7 ते 9 तास झोपले पाहिजे

65 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या व्यक्तींनी रोज कमीत कमी 7 ते 8 तास झोप घेती पाहिजे.