निसर्गप्रेमींनी हमखास पाहायला हवा ईशान्य भारत, याठिकाणी कुठे आणि कधी द्यावी भेट?

North East अर्थात ईशान्य भारत म्हणजे जणू स्वर्गच. कारण निसर्गाचा वरदहस्त या प्रदेशाला लाभला आहे.

म्हणूनच ईशान्य भारतातली अनेक ठिकाणं पर्यटकांची आवडती आहेत. निसर्गप्रेमींनी ईशान्य भारताची सैर करायलाच हवी.

अरुणाचल प्रदेशातलं तवांग हे एक पाहण्यासारखं ठिकाण आहे.

नागालँडची राजधानी असलेल्या कोहिमामध्ये सुट्टी एंजॉय करण्यासारखा उत्तम प्लॅन दुसरा असूच शकत नाही.

मणिपूरमधलं इम्फाळ हेदेखील असंच निवांतपणे राहण्यासारखं सुंदर ठिकाण आहे.

गुवाहाटीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामाख्या मंदिरासह अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत.

त्रिपुरा राज्यातल्या आगरताळ्यामध्ये आपला सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित होऊ शकतो.

सिक्कीममध्ये नाथु ला पाससह अनेक ठिकाणं आवर्जून फिरण्यासारखी आहेत.

मार्च ते ऑक्टोबर हा ईशान्य भारतात पर्यटनासाठी जाण्याचा चांगला सीझन आहे.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?