ब्लड प्रेशर लो झाल्यावर काय कराल?

ब्लड प्रेशर अचानक कमी झाल्याने डोळ्यांसमोर अंधारी येणे, हात-पायांना घाम येणे, चक्कर येणे या समस्या जाणवतात.

कमी रक्तदाबाचे एक कारण तुमचा आहार असू शकतो. तेव्हा हा त्रास टाळण्यासाठी आहारात काही बदल करण्याचा प्रयन्त करा.

अंड्याच्या सेवनाने ब्लड प्रेशरच्या रुग्णांना आराम मिळू शकतो. अंड्यात असलेले व्हिटॅमिन बी-12 लाल रक्त पेशींचे उत्पादन वाढवतात.

कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी अंड्यांचा आहारात समावेश करा. 

डार्क चॉकलेट खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

डार्क चॉकलेटमुळे शरीराचे वजन आणि रक्तातील चरबीची पातळी न बदलता बीपी नियंत्रणात आणता येतो.

ब्लड प्रेशरच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी द्राक्षाचा रस खूप प्रभावी आहे.

कोणत्याही परिस्थितीत बीपी कमी असल्यास एक ग्लास द्राक्षांचा रस प्यायल्यास लगेच आराम मिळतो.

कॅफिन हे रक्तदाब वाढवण्यासाठी सर्वात उपयुक्त मानले जाते .

जर रक्तदाब अचानक कमी झाला तर रुग्णाला कॉफी दिल्यानंतर काही सेकंदातच बरे वाटते.

कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी शक्य तितके द्रवपदार्थ घ्यावे.

कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांना दिवसातून किमान दोन लिटर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.