जमिनीवर बैठक मारून जेवणे ही पूर्वपरंपरागत भारतीय पद्धत असून वैज्ञानिकदृष्ट्या ही पद्धत अत्यंत योग्य ठरते.
आयुर्वेदात असे म्हंटले जाते की, जेवताना मांडी घालून आणि वाकून खातो त्यामुळे पोटावर योग्य प्रेशर येत आणि जेवण उत्तमरित्या पचण्यास मदत होते.
जमिनीवर बसून जेवल्याने पोट लवकर भरल्यासारखे वाटते आणि प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले जात नाही.
तेव्हा वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ही पद्धत अवलंबू शकता.
मांडी घालून बसण्याने पोटावर ताण येतो आणि पोटाची हालचाल चालू राहाते.
जमिनीवर बैठक मारून जेवल्याने पाठ सरळ राहून पायांना ताकद देण्याचे काम मांडी घालून बसल्यामुळे होते.
जमिनीवर पाय क्रॉस करून बसल्याने पचनक्रिया अधिक चांगली होण्यास मदत मिळते आणि जमिनीवर ताट ठेऊन खाल्ल्याने शरीर पुढे मागे होत व्यवस्थित व्यायाम होतो.
भारतीय बैठकीत बसून जेवल्याने अन्न त्वरीत पचण्यास मदत मिळते. मांसपेशी सक्रिय होऊन पोटातील अॅसिडचा स्राव वाढतो आणि अन्नपचन होते.
जमिनीवर मांडी घालून बसून जेवल्यानंतर आपल्या शरीरातील रक्तप्रवाह जलद होतो कारण यामुळे नसा शांत होतात आणि तणाव दूर होतो.