'या' वेगवेगळ्या रंगीत चहाचे फायदे माहितीये? 

आपल्याकडे चहाप्रेमींची कमी नाही. मात्र लाल, काळा, हिरवा चहासोबत इतर रंगाच्या चहाचे फायदे तुम्हाला माहितीये?

चला तर मग जाणून घेऊया हे रंगीत चहा कोणकोणते आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत. 

काळा चहा : हा चहा भारत, चीन, मंगोलिया इत्यादी देशांमध्ये उत्पादित केला जातो. हा चहा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. 

ग्रीन टी : या चहाचे उत्पादन भारत आणि चीनमध्ये केले जाते. यामध्ये मधुमेह, कर्करोग, मानसिक आजारांशी लढण्याची क्षमता असते. 

ब्लु टी : हा चहा अपराजिताच्या फुलांपासून तयार केला जातो. हा कॅफिनमुक्त हर्बल टी असतो. 

ब्लु टी स्मरणशक्ती सुधारण्यासाठी, चिंता कमी करण्यासाठी, दमा, ताप, मधुमेह या सर्वांमध्ये फायदेशीर असतो. 

रेड टी : दक्षिण आफ्रिकेत वाढणाऱ्या एस्पलाथस झाडापासून हा चहा तयार केला जातो, याला रुबोस चहा म्हणतात. 

यामध्ये ग्रीन टीपेक्षा 50 टक्के जास्त अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे हा चहा पचनास मदत करतो, केस मजबूत बनवतो, रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. 

ग्रीन टीनंतर पिवळा चहा लोकांमध्ये दुसरा खूप आवडीचा आहे. हा चहा चीनमधून सर्वत्र पसरला.