त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे गाजर

गाजरात बीटा कॅरोटीनसारखी अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्यांना केशरी रंग येतो.

गाजराचा कीस आणि मध यांच्या मिश्रणातून तयार केलेला फेस पॅक त्वचेला तजेला देतो.

गाजरात व्हिटॅमिन ए असतं. ते फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यास मदत करतं.

त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडण्यासारखी वृद्धत्वाची लक्षणं लवकर दिसत नाहीत.

पोटॅशियमच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होऊ शकते. गाजर पोटॅशियमने समृद्ध असतं.

गाजरामुळे त्वचा मुलायम आणि पाणीदार बनण्यास मदत होते.

ऊन-वाऱ्यातून आल्यावर त्वचेवर धूळ बसते. गाजर स्प्रे वापरल्यास त्वचा तजेलदार होते.

गाजराचा ज्यूस नियमितपणे प्यायल्यास केस मजबूत होतात. 

कच्चं गाजर खाल्ल्यास दात स्वच्छ होतात आणि तोंडाचं आरोग्य चांगलं राहतं.

मेनॉपॉझनंतरच्या काळातला त्रास कमी करण्यासाठी महिलांनी गाजर आहारात ठेवणं लाभदायक.