तुम्ही अनेकदा संत्र, मोसंबी, डाळिंब इत्यादींचा ज्यूस पिला असेल. पण तुम्ही कधी बेल फळाचा ज्यूस प्यायलाय आहे का?
बेल फळाचा ज्यूस हा उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो. तसेच हे फळ पोटाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी फायदेशीर असते.
बेल फळामध्ये मध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात.
बेल फळाच्या ज्यूस शरीरात पाण्याची कमतरता, पोटात जळजळ, बद्धकोष्ठता, छातीत जळजळ इत्यादी गोष्टींवर रामबाण आहे.
याज्यूसचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतोच पण यासोबत पोट देखील साफ होण्यास मदत होते.
बेल फळाचा ज्यूस प्यायल्याने रक्त शुद्ध होत.
तेव्हा उन्हाळ्यात घरच्याघरी बेल फळाचा ज्यूस बनवण्याची कृती जाणून घ्या.
बेलचे फळ कापून त्यातील गर काढून घ्या.
ज्यूस बनवण्यासाठी 2 ग्लास पाणी घ्या आणि बेल फळाचा गर त्यात मिसळा.
हे मिश्रण नीट ढवळून घ्या. अशाप्रकारे बेलचा ज्यूस तयार होतो.