भारतातील अतिशय सुंदर श्रीकृष्णाची मंदिरं माहितीय का?

मथुरातील वृंदावन येथे 'प्रेम मंदिर' आहे. अतिशय सुंदर, संगमरवरीमध्ये हे मंंदिर उभं केलेलं आहे. 

श्रीकृष्णाचे विचार जगभरात पोहोचविण्यासाठी इस्काॅनतर्फे असंख्य मंदिरे जगभरात उभारण्यात आलेली आहे.

गुजरातमधील 'द्वारकाधीर मंदिर' हे 72 खांब आणि 5 मजली आहे. 2500 वर्षांपूर्वीचं हे जुनं मंदिर जगत मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. 

केरळमध्ये प्रसिद्ध असणारं श्रीकृष्णाचं गुरुवायरू मंदिर पवित्र तिर्थक्षेत्र आहे. भुलोका वैकुंठ म्हणूनही या मंदिराला ओळखले जाते. 

मथुरेतील श्रीकृष्णाचं जुगल किशोर मंदिर हे अत्यंत दुर्मिळ मंदिर आहे. या मंदिराला केशी घाट असेही म्हणतात. 

गुजरातच्या अहमदाबाद शहरातील जगन्नाथ मंदिर प्रसिद्ध आहे. येथे श्रीकृष्ण आणि त्यांचे भाऊ बलराम व सुभद्रा यांच्याही मुर्ती आहेत. 

उत्तर प्रदेशमध्ये बांके बिहारी मंदिर श्रीकृष्णाचे आहे. त्रिभंगाच्या मुद्रेत या मंदिरातील मुर्ती आहे. 

कर्नाटकातील उडपी येथे श्रीकृष्ण मठ आहे. 13 व्या शतकात हे मंदिर उभारलं गेलं आहे. 

राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिर हे श्रीकृष्णाचं प्रसिद्ध मंदिर आहे. 17 व्या शतकात श्रीकृष्ण मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. 

पिंक सिटी जयपुरमध्ये श्रीकृष्णाचा अवतार असणारे गोविंद देवजी हे मंदिर आहे. सिटी पॅलेसमध्ये हे मंदिर आहे.