भारतातील 'या' शहरांत जातात सर्वात जास्त पर्यटक 

भारतात पिंक सिटी म्हणून जयपूरला ओळखलं जातं. तेथील राजवाडे, शाही इमारती आणि महाल सर्वांना आकर्षित करतात. 

पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून श्रीनगर शहराला ओळखलं जातं. इथलं खास वातावरण तुम्हाला वेगळाच अनुभव देतं.

प्रेमाची नगरी म्हणून आगरा शहाराची ओळख आहे. ताजमहाल, आरगा किल्ला आणि अनेक ऐतिहासिक ठिकाणं तिथं पाहण्यासारखी आहेत. 

म्हैसूर हे समृद्ध, सुंदर आणि स्वच्छ शहर आहे. ऐतिहासिक स्थळं आणि सांस्कृतिक वारसा या शहराला आहे. 

हुगळी नदीच्या किनाऱ्यावरील कोलकाता हे शहर सिटी ऑफ जाॅय नावाने ओळखले जाते. आकर्षक वास्तुकला तेथे पाहायला मिळतात.

अध्यात्मिक नगरी म्हणून वाराणसी शहराची ओळख आहे. गंगा आरती प्रसिद्ध आहे. विविध मंदिरांचं दर्शन घेता येतं. 

भारताची राजधानी दिल्ली हे शहर पाहण्यासारखे आहे. ऐतिहासिक किल्ले आणि इथले खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत.

चंदीगड ही स्वप्नांची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथील सुंदर वातावरण पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. 

अद्भूत वास्तुकलेसाठी मुंबई हे शहर पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तेथील ऐतिहासिक स्थळंदेखील खूप पाहाण्यासारखी आहेत.