केळं आकाराने वाकडंच का असतं?

केळ हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. डॉक्टरही ते खाण्याचा सल्ला देतात

अनेक लोक दररोज  केळी खातात. पण तुम्ही केळ्याबद्दल एक गोष्ट नोटीस केलीय का?

केळ कधीही सरळ वाढत नाही किंवा ते आर्ध वर्तुळात का वाढतं? ते असं वाकडं का असतं? चला कारण समजून घेऊ

केळ्याच्या झाडाला आधी फूल येते. नंतर या फुलांच्या पाकळ्यां खाली केळीच्या लहान फळांची रांग वाढू लागते.

एकदा का ते फळ आकाराने मोठे झाले की, केळ्याचे फळ एका प्रक्रियेतून जाते, ज्याला विज्ञानाच्या भाषेत निगेटीव्ह जिओट्रोपिझम म्हणतात

साध्या भाषेत बोलायचं झालं तर या प्रोसेसचा अर्थ म्हणजे केळ्याचे फळ इतर फळांप्रमाणे जमिनीच्या दिशेने न वाढता सुर्यप्रकाशाच्या दिशेने वाढते

म्हणजेच काय तर हे फळ जेव्हा वाढत असते तेव्हा ते वारच्या बाजूला वाढते आणि मग वळू लागते

सहसा केळी अशा भागात उगवतात, जिथे कमी सूर्यप्रकाश असतो. यामुळे केळी सुर्यप्रकाश घेण्यासाठी वरच्या दिशेने वाढू लागतात आणि त्याचा आकार वाकडा होतो

केळी हे एकमेव झाड नाही जे निगेटीव्ह जिओट्रोपिझमशी संबंधित आहे. सूर्यफुला देखील याचं एक उदाहरण आहे