एटीएम मशिनमध्ये एटीएम कार्ड अडकल्यास काय कराल? काळजी नको, फॉलो करा या स्टेप्स

बराच वेळ तुमचा तपशील प्रविष्ट केल्यास किंवा चुकीची माहिती प्रविष्ट केल्यास अनेक वेळा कार्ड अडकते


वीज जोडणीमध्ये अडचण आल्यास किंवा वीज गेल्यावर तसंच इतर तांत्रिक समस्येमुळे कार्ड एटीएममध्ये अडकू शकते. शिवाय सर्व्हरशी कनेक्शनमध्ये समस्येमुळेही हा प्रकार घडू शकतो


जर तुमचं डेबिट कार्ड एटीएम मशिनमध्ये (ATM system) अडकलं तर तुम्ही ताबडतोब बँकेला कळवावं.


बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून हे कोणत्या शहरात आणि कोणत्या मशीनवर (म्हणजे ठिकाण) घडलं आहे ते सांगणं आवश्यक आहे.


जर ते एटीएम मशीन त्याच बँकेचं असेल ज्यामध्ये तुमचे खाते आहे, तर तुम्हाला तुमचं कार्ड अगदी सहज परत मिळेल


जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला काहीशा त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.

तुम्ही कस्टमर केअरला याबाबत सांगाल, तेव्हा तेथून तुम्हाला दोन पर्याय दिले जातील. पहिला पर्याय म्हणजे कार्ड रद्द करणं. त्यानंतर नवीन कार्डसाठी अर्ज केल्यास तुम्हाला 7-8 दिवसात ते मिळेल



दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये कार्ड अडकल्यास दुसरा मार्ग आहे. सर्व बँका त्यांची अडकलेली कार्डे ज्या बँकांमध्ये ती कार्ड जारी केली जातात त्यांना पाठवतात.

म्हणजेच, ज्या बँकेचं कार्ड त्याच बँकेला पाठवण्यात येईल. अशा पद्धतीनं तुमचं कार्ड तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत परत मिळवू शकता.