चेहऱ्यावर बदाम तेल लावण्याचे फायदे

बदाम आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जातात. तसेच त्याचे तेल देखील त्वचेसाठी उपयुक्त ठरते.

तेव्हा बदाम तेल लावल्याने चेहेऱ्यावरील त्वचेला कोणते फायदे होतात ते पाहुयात.

बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ए असते. त्यामुळे बदाम तेलचेहऱ्यावर लावल्याने डार्क सर्कल्स कमी होतात.

कोरड्या त्वचेवर बदाम तेल लावल्याने त्वचा चमकदार आणि स्वच्छ दिसते. त्याचा टोन देखील सुधारतो.

बदाम तेलाने त्वचेची छिद्र उघडतात आणि त्यात साचलेली घाण निघून जाते.

बदाम तेलात झिंक मुबलक प्रमाणात असलयाने चेहऱ्यावर येणारे पिंपल्स आणि डाग निघून जातात.

बदाम तेल तुमच्या त्वचेला मॉइश्चराइज करते. आणि त्वचेचा कोरडेपणा दूर करते.

बदाम तेलात आढळणारे फॅटी ऍसिड आणि ओमेगा 3 हे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आणि सुरकुत्यांपासून त्वचेचे संरक्षण होते.

बदाम तेल त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स दूर करते.