दुपारची झोप आरोग्यासाठी चांगली की वाईट? 

दुपारच्या झोपेबद्दल लोकांमध्ये संभ्रम असतो, तज्ञांचीही यावर वेगवेगळी मतं आहेत. 

बऱ्याच लोकांना रोज दुपारचे जेवण केल्यानंतर थोडी डुलकी किंवा झोप घेण्याची सवय असते. 

पण या दुपारच्या झोपेचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो माहितीये?

तुम्हाला दुपारी झोपायचे असेल तर किती वेळ झोपायला हवे याबाबत डॉक्टर काही सूचना देतात. 

डॉक्टरांच्या मते, जड अन्न खाल्ल्यानंतर झोप येते. मात्र ही झोप अनियंत्रित नसावी. 

दुपारची झोप 2.30 वाजेपर्यंत पूर्ण व्हावी आणि ती अर्ध्या तासापेक्षा जास्त असू नये. 

या दुपारच्या झोपला वामकुक्षी म्हणतात. यामध्ये एका बाजूला झोपावे. 

संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत कधीही झोपू नये, कारण यामुळे रात्रीच्या झोपेमध्ये व्यत्यय येतो. 

दुपारची 15 ते 20 मिनिटांची झोप तुमचे शरीर निरोगी आणि फ्रेश ठेवण्यासाठी मदत करते.