ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. जेव्हा चंद्र सूर्य पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते.
2023 चे पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 07.05 वाजता होणार आहे. हे ग्रहण दुपारी 12.29 वाजता संपेल.
हे ग्रहण अश्विनी नक्षत्रात मेष राशीत होईल. 20 एप्रिल रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 24 मिनिटे असणार आहे.
सूर्यग्रहणाचा जगावर अशुभ प्रभाव पडतो. पण हे ग्रहण ज्या भागातून दिसते, त्या भागात त्या वेळेला सुतक काळ लागतो.
पण या वेळी हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, ज्यामुळे ते भारतात पाळले जाणार नाही.
भारतातून ग्रहण दिसतं, तेव्हा सगळ्या मंदिराचे दरवाजे बंद केले जातात, काही लोक देव झाकतात, तर काही देवांना पाण्यात ठेवतात.
असं करण्यामागे अनेक प्रकारच्या धार्मिक समजुती प्रचलित आहेत. मान्यतेनुसार या काळात दैवी शक्तींचा प्रभाव कमी असतो, तर असुरी शक्तींचा प्रभाव अधीक असतो.
वैज्ञानिक कारण म्हणजे या काळात पृथ्वीच्या वातावरणात हानिकारक किरणांचा प्रभाव असतो, त्यामुळे या काळात खाण्यापिण्यास मनाई असते.
पण यावेळी सुतक भारतात नाही, भारताला वेद लागणार नाहीत, ज्यामुळे भारतात ते पाळलं जाणार नाही आणि त्यामुळेच या ग्रहणात मंदिरं बंद ठेवली जाणार नाहीत.