मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती, मसेज सेव्ह करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते.

मात्र, व्हॉट्सअपवर हे काम चटकन आणि सोप्या पद्धतीनं करता येतं.

बऱ्याचदा महत्त्वाचे मेसेज/ माहिती कुठे सेव्ह केली ते लक्षात राहत नाही.

महत्त्वाची सेव्ह केलेली माहिती आपल्याला लगेच मिळण्यासाठी एक सोपा उपाय आहे.

यासाठी तुम्ही व्हॉट्सअपवर महत्त्वाची माहिती म्हणून एक ग्रुप बनवू शकता.

ग्रुप बनवताना कोणीही एक व्यक्ती अॅड करून ग्रुप क्रिएट करून घ्या.

ग्रुप तयार झाल्यानंतर त्या व्यक्तीला लगेच रिमूव्ह करून टाकू शकता.

तुमच्या आवडीचं या ग्रुपला नाव देऊन त्याला पिन करा.

म्हणजे तो ग्रुप नेहमी सर्वात वर राहील आणि तुम्हाला महत्त्वाचे मेसेज त्यात पाठवून ठेवता येतील.

हवे असल्यास कुंटुबातील कोणाला हे मेसेज दिसावेत म्हणून तुम्ही त्यांना अॅड करू शकता.