नारळ पाणी पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

हेल्दी लाईफसाठी बरेच लोक नारळ पाणी पितात. आजारी व्यक्तीला नारळ-पाणी प्यायला दिलं जातं.

मात्र, जास्त पाणी आणि मलई असलेला नारळ कसा निवडायचा ते जाणून घेऊया. 

काही टिप्सच्या मदतीने, कमी मलई आणि जास्त पाण्याचा नारळ कसा शोधायचा ते पाहुया.

काही लोक आकार पाहून नारळ खरेदी करतात. बहुतेकांना वाटतं की, मोठ्या आकाराच्या नारळात पाण्याचे प्रमाण जास्त असेल. 

मात्र, तसे अजिबात नाही. मोठ्या नारळात पाणी कमी आणि मलई जास्त असते. 

त्याचबरोबर लहान नारळांमध्येही पाण्याचे प्रमाण कमी असते, त्यामुळे मध्यम आकाराचा नारळ घेणे चांगले. 

तसेच पाण्यासाठी नारळ विकत घेताना तो हलवूनही पाण्याची कल्पना येऊ शकते.

सहसा हिरव्या रंगाचा नारळ हा सर्वात ताजा आणि जास्त पाणीदार असतो. 

Heading 2

नारळाच्या आकारावरून पाण्याचा अंदाज लावू शकता. लांब आणि तिरकस नारळापेक्षा गोल नारळात जास्त पाणी असते.