राकेश झुनझुनवाला यांच्यानंतर 46 हजार कोटींच्या साम्राजाचा वारस कोण?

शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी निधन झालं.

जगभरातील श्रीमंतांच्या यादीत ते 440 क्रमांकावर होते. एकूण संपत्ती तब्बल 46 हजार कोटी होती.

पण, त्यांच्या इतक्या मोठ्या संपत्तीचा वारस कोण? कोण चालविणार त्यांचं साम्राज्य? जाणून घेऊया...

त्यांच्या पश्तात पत्नी रेखा, मुलगी निष्टा, मुले आर्यमन आणि आर्यवीर असा परिवार आहे. 

अकासा एअरमध्ये 40 टक्के भागीदारी ही झुनझुनवाला दाम्पत्याची आहे.

स्टार हेल्थ अलाईड इन्शुरन्सचे प्रमोटरमध्ये 17.46 टक्के भागीदारी आहे. 

राकेश झुनझुनवाला यांच्यानंतर ही सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली आहे. 

आपल्या मुलांना सोबत घेऊन रेखा झुनझुनवाला त्यांचं साम्राज्य सांभाळतील. 

राकेश झुनझुनवाला यांच्या एकूण 32 कंपन्या आहेत. अनंत राज, टाटा मोटर्स, टायटन, फेडरल बँक, नजरा, स्टार हेल्थ, अशा कंपन्यांचा समावेश आहे.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!